अर्जेंटिनात एका 23 वर्षांच्या युवकाने आपल्याच नात्यातल्या एका 91 वर्षांच्या वृद्धेशी लग्न केलं. पण हे लग्न आता कायद्याच्या कचाट्यात सापडलं आहे. त्याचं झालं असं की लग्नाच्या अवघ्या 24 व्या दिवशी या वृद्धेचं निधन झालं आणि आता तिच्या पतीने तिची पेन्शन मिळावी म्हणून अर्ज केला आहे पेन्शन हा वयोवृद्धांना सरकारने दिलेला एक आधार आहे. पण त्यासाठी या युवकाने अर्ज केल्याने त्याने आर्थिक फायद्यासाठीच तिच्याशी लग्न केलं असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. प्रकरण आता कोर्टात आहे.मॉरिसियो ओस्सोला असे या युवकाचे नाव आहे. योलांदा टॉरेस नावाच्या 91 वर्षीय महिलेसोबत तो काही वर्षे एकत्र राहात होता. 2015 मध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर हे जोडपं रियो दी जेनेरिओला गेलं होतं. तिथेच लग्नाच्या अवघ्या 24 दिवसांतच योलांदाचं निधन झालं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews